Menu

पुणे : महापालिका भवन परिसरातील कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप ई-बस महापालिका भवन येथील पीएमपी स्थानकात आल्यानंतर या भागातील वाहतूक विस्कळीत झाली.

nobanner

महापालिका भवन परिसरात शुक्रवारी सायंकाळी वाहतूक कोंडी झाली. तासभर कोंडीत अडकून पडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ई-बस महापालिका भवन परिसरात आणण्यात आल्या.

ई-बस महापालिका भवन येथील पीएमपी स्थानकात आल्यानंतर या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. जंगली महाराज रस्ता तसेच महापालिका भवन, कुंभारवाडा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तासभर वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.