Menu

दुनिया
मतदानाला बॉलीवूड कलाकारांची दांडी ?

nobanner

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ एक नजर (04-04-2014 : 09:14:48) ऑनलाइन टीम मुंबई, दि. ४ – मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करणारे बॉलीवूडमधील कलाकार मंडळी स्वतः मात्र मतदानाला दांडी मारतील अशी चिन्हे आहेत. २४ ते २६ एप्रिल या कालावधीत अमेरिकेत पुरस्कार सोहळा होणार असून या सोहळ्याला बॉलीवूडमधील बहुसंख्य कलाकार हजेरी लावणार असल्याचे समजते. त्यामुळे लोकांना समाजप्रबोधनाचे धडे देणा-या कलाकारांनी आधी स्वतःदेखील सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे असे सर्वसामान्य मतदारांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, लोकांनी प्रथम मतदान करावे मग अन्य कामाकडे वळावे, पैसे घेऊन मत देऊ नये असे आवाहन करत बॉलीवूडमधील अनेक कलाकार मतदारांमध्ये जनजागृती करताना दिसत आहे. पण या कलाकारांना स्वतः मात्र याचे अनुकरण करता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेसृष्टीचे प्रतिनिधीत्व करणारा ख्यातनाम पुरस्कार सोहळा २४ ते २६ एप्रिल या कालावधीत अमेरिकेतील तांबा बे येथे पार पडणार आहे. या सोहळ्याला शाहीद कपूर, फरहान अख्तर, रणवीर सिंह, सैफ अली खान या अभिनेत्यांपासून ते माधूरी दीक्षित, बिपाशा बासू, करिना कपूर,