दुनिया
लायटरचा खेळ बेतला बारा जणांच्या जिवावर
शुक्रवार ४ एप्रिल २०१४ एक नजर (04-04-2014 : 02:11:40) बीजिंग : चीनमध्ये एका तीन वर्षांच्या मुलीने सिगारेट पेटवण्यासाठी वापरल्या जाणार्या लायटरशी खेळणे १२ जणांच्या जीवावर बेतले. एका वर्कशॉपला लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीकडून हा खुलासा करण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी चीनच्या गुआंगडोंग प्रांताच्या दक्षिणेकडील जुन्बू येथे हा अपघात झाला होता. चौकशीकर्त्यांनुसार, कापड दुकानदाराची तीनवर्षीय मुलगी लायटरसोबत खेळत होती. यादरम्यान, वर्कशॉपमध्ये अचानक आग लागून यात १२ जणांचा जीव गेला. या अपघातात अन्य अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी वर्कशॉप मालकावर रहिवासी इमारतीचा व्यावसायिक कारणासाठी वापर करणे आणि आगीपासून बचावासाठी पर्याप्त उपाययोजना न करण्याचा आरोप आहे. या अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाईपोटी आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, आर्थिक मदतीचा आकडा जाहीर करण्यात आला नाही. भ्रष्टाचार आदी अव्यवस्थांमुळे चीनमध्ये सुरक्षा निकषांचे उल्लंघन ही एक सामान्य बाब झाली आहे. कारखाने, खाणी आदी ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. गेल्या जूनमध्ये जिलिन प्रांतात एका पोल्ट्री