खेल
रमजानमध्ये केक कापल्याने वकार युनूसवर टीकेचा भडीमार, मागितली माफी
nobanner
पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनुसला आपला सहकारी खेळाडू वसिम अक्रमच्या जन्मदिनी केक कापणं चांगलंच अंगलट आलंय. रमजानच्या महिन्यामध्ये केक कापल्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर टीकेचा भडीमार होत आहे.
रविवारी वसिम अक्रमचा ५२ वा वाढदिवस होता, त्यावेळी हेडिंग्लेमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान आणि इंग्लंडच्या कसोटी सामन्यात तो समालोचन करत होता. दरम्यान वकार युनूस आणि रमीज राजा हे अक्रमसोबत केक कापताना दिसले. रमजानच्या महिन्यात केक कापण्याचा त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पाकिस्तानच्या नागरिकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करायला सुरूवात केली.
ट्विटरवर वाढता रोष पाहून अखेर वकार युनूसला माफी मागावी लागली आहे. आम्हाला रमजान आणि रोजा ठेवणाऱ्यांचा आदर करायला हवा, झालेल्या प्रकाराबाबत माफी मागतो ,असं ट्विट करुन त्याने माफी मागितली आहे.
Share this: