Menu

देश
भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं पालघर

nobanner

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात काल रात्री सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. रात्री १ ते पहाटे तीनच्या दरम्यान रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचे दोन धक्के तर २.८ आणि २.९ तीव्रतेचा एक एक धक्का बसल्याने नागरिक पुन्हा एकदा दहशतीत आहेत. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. २०१९ मध्ये भूकंपाच्या ३० ते ३५ सौम्य धक्क्यांची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे रात्रभर पाऊस पडत असताना दुसरीकडे भूकंपाचे धक्के बसत होते. कठीण परिस्थिती असूनही नागरिकांनी घराबाहेर पडणेच पसंत केले. आम्ही पावसात भिजत थांबलो कारण घरात गेलो तर भूकंपाच्या धक्क्यांनी आम्हाला भीती वाटली असं गावकऱ्यांनी सांगितलं.