Menu

देश
नवी मुंबईतील विद्यार्थ्याचा कॉलेजमध्ये जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न

nobanner

कळंबोली येथील सुधागड विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यानं स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा केल्याचा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यानं हे पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यानं स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना घडली. या घटनेत संबंधित विद्यार्थ्यी ९० टक्के भाजला आहे. दरम्यान, त्याला ऐरोलीतील नॅशनल बर्न रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तो विद्यार्थी शौचालयात गेला. त्यानंतर त्याने पेटलेल्या अवस्थेत त्याच्या वर्गाकडे धाव घेतली. काही समजण्यापूर्वीच घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित शिक्षकांनी त्याचे कपडे फाडून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत तो ९० टक्के भाजला असल्याची माहिती समोर आली आहे