अपराध समाचार
जळगाव हादरले! अल्पवयीन मुलीला पळवून नेत कारमध्ये केला बलात्कार
- 266 Views
- March 22, 2022
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on जळगाव हादरले! अल्पवयीन मुलीला पळवून नेत कारमध्ये केला बलात्कार
- Edit
nobanner
जामनेर तालुक्यातील पहूर येथे राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर ( minor girl raped in car ) कारमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गणेश पवार याच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. पण या घटनेनंतर आरोपी गणेश पवार हा फरार झाला आहे.
गेल्या आठवड्यात १८ तारखेला गणेश शांताराम पवार याने अल्पवयीन मुलीला पळून जाऊ, असे सांगून त्याच्या पांढऱ्या रंगाच्या इको गाडीत बसविले. त्यानंतर एका गावाजवळील रस्त्याजवळ गाडी थांबवून गाडीतच त्याने पीडितेवर अत्याचार केला, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गणेश पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करत आहेत.
Share this: