Menu

देश
Barsu Refinery Survey : बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात, 17 पोलीस जखमी

nobanner

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण (Barsu Refinery Survey) आजपासून (24 एप्रिल 2023) पुन्हा सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क असताना रिफायनरीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. राजापूर बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीसाठीच्या माती सर्वेक्षण करण्यात येत असून काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या कारणास्तव विविध भागांतून पोलीस बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले होते. राजापूर येथील बंदोबस्तासाठी पोलिसांची गाडी निघाली असता कशेळी बांध येथे पोलिसांची व्हॅन पलटी झाली. या अपघातात 17 पोलीस जखमी झाले असून जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.