Menu

देश
ऐन दिवाळीत मुंबईकरांचे होणार हाल; डेपोतून एकही बस न सोडण्याचा निर्णय

nobanner

सध्या सगळीकडे दिवाळी सेलिब्रेशन जोरात सुरु आहे. लागून सुट्ट्या आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यायत. दरम्यान ऐन दिवाळीत मुंबईकरांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येतेय. मुंबईकरांसाठी मुंबईचं जनजीवन असलेल्या बेस्टची सुविधा उद्या नागरिकांच्या सेवेत नसेल. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना टॅक्सी, रिक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे. उद्यापासून डेपोतून एकही बस न सोडण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त
ऐन दिवाळीत बेस्ट प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणारा बोनस यंदा 4-5 दिवस उलटले तरी देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच कर्मचारी आपला संताप व्यक्त करत आहेत. आधीच दिवाळी असल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यात उद्या भाऊबीज असल्याने बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी असेल. पण आगारातून एकही बेस्ट सुटणार नसल्याने मुंबईकरांचे चांगले हाल होणार आहेत.

बैठकीतून मार्ग निघेना
कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून निधीची जुळवाजुळव सुरूच होती. यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. असे असतानाही बोनस देण्याचा मार्ग काही निघताना दिसत नाही. असे असताना आचारसंहिता असल्याने बोनस झाला नसल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. लवकरच बोनस केला जाईल असे आश्वासन देण्यात येत आहे. पण कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहे. 2 नोव्हेंबरच्या दिवसभरात बोनस जमा झाला नाही तर रविवारपासून कर्मचारी आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.