Menu

मनोरंजन
मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचे निधन, शेवटच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मला विचित्र…

nobanner

बॉलिवूड अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचे रविवारी अमेरिकेत निधन झाले. डान्सर आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी हेलेना यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर शेअर केली आहे. हेलेना यांनी 80च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक लहान-सहान भूमिका निभावल्या आहे. हेलेना यांनी बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही.

हेलेना यांनी अमिताभ बच्चन यांच्या मर्द चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळं त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांनी दो गुलाब, आओ प्यार करे, साथ साथ या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मिथुन चक्रवर्ती आणि हेलेना यांनी लग्न केले होते. मात्र, त्यांचे लग्न फक्त 4 महिनेच टिकलं होतं. नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. एका जुन्या मुलाखतीत हेलेना यांनी म्हटलं होतं की, मिथुनसोबतचं लग्न म्हणजे एक पुसटसं स्वप्न होतं, असं त्यांनी म्हटलं होतं.

स्टारडस्ट मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, तो माझ्यासाठी सर्वोत्तम आहे यावर मी विश्वास ठेवावा यासाठी माझा ब्रेनवॉश करण्यात आला होता. दुर्दैवाने ते यशस्वी झाले. मी कधीच त्यांच्यासोबत जाणार नाही. तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जरी असला तरी मी नाही जाणार. मी त्याच्याकडून कधी पोटगीदेखील घेतली नाही. ते एक वाईट स्वप्न होतं जे आता संपलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांनी हेलेना यांच्या वडिलांना वचन दिलं होतं की मी तुमच्या मुलीला जगातील 9वं आश्चर्य आहे असं समजून सांभाळेन. मात्र मिथून यांनी हेलेना यांना एकटं सोडलं. एका मुलाखतीत हेलेना यांनी म्हटलं होतं की, मी त्यांच्यावर खरंच विश्वास ठेवला जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. पण जेव्हा मी त्यांना समजून घ्यायचा प्रय़त्न केला तेव्हा मला जाणीव झाली की तो फक्त त्याच्यावरच प्रेम करतो. ते खूप इमॅच्युअर होते आणि मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान होते. मात्र तरीही मला मीच मोठी वाटत होते.

हेलेना यांनी रविवारी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी फेसबुकवर शेवटची पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये हेलेना यांनी म्हटलं होतं की, मला खूप विचित्र वाटतंय. मिक्स फिलिंग्स येत आहेत. काहीच कळत नाही. कात्रीत पकडल्यासारखं वाटतंय, असं त्यांनी पोस्ट केलं होतं.