अपराध समाचार
कंडोम, साडी, फटाक्यांची माळ, ट्रायपॉड, शरणू हांडे प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेलं साहित्य नेमकं कशासाठी?
- 180 Views
- August 08, 2025
- By crimesoch
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on कंडोम, साडी, फटाक्यांची माळ, ट्रायपॉड, शरणू हांडे प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेलं साहित्य नेमकं कशासाठी?
- Edit
भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांमधील वाद टोकाला पोहोचला असून काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीची व बदनामीचा बदला घेण्यासाठी रोहित पवार समर्थकांनी शरणू हांडेंचं अपहरण करत मारहाण केल्याचा संशय व्यक्त होत आहे. अपहरणाच्या घटनेबाबत माहिती मिळताच सोलापूर (Solapur) पोलिसांनी तात्काळ 4 पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली, त्यानंतर आरोपींना अटक करुन न्यायालयातही हजर करण्यात आले. मात्र, आरोपींकडून साडी, फटाक्यांची माळ, कंडोम आणि ट्रायपॉड असं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे, आरोपींकडून जप्त करण्यात आलेलं साहित्य नेमकं कशासाठी होतं असा प्रश्न अनेकांना व पोलिसांनाही पडला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या रोहित पवारांच्या समर्थकाना बेदम मारहाण केल्याची घटना मे महिन्यात घडली होती. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आला होता. यापुढे पडळकरांच्या विरोधात काही कृत्य केल्यास त्याला अशाचप्रकारे धडा शिकवला जाईल, अशी धमकीही त्यावेळी पडळकर समर्थकांनी दिली होती. या घटनेमुळे पवार समर्थकांची मोठी बदनामी झाली, पण कुठलीही पोलीस तक्रार न करता, त्यांनीही जशास तसे उत्तर देण्याचं मनाशी ठरवलं अन् त्यातूनच, मारहाण करणाऱ्या शरणू हांडेचे अपहरण करुन व्हिडिओ बनविण्याचा प्लॅन आखला होता का? अशी शंका व्यक्त होत आहे.
शरणू हांडेप्रकरणात विविध वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून साडी, ट्रायपॉड, फटाक्यांची माळ आणि कंडोमची पाकिटेही जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे, आरोपींचा नेमका काय प्लॅन होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, ज्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून रोहित पवार समर्थकांची बदनामी करण्यात आली होती, त्याचप्रमाणे पडळकर समर्थकांची बदनामी करायची होती का? व्हिडिओ बनवून तो व्हायरल करायचा असल्यानेच ट्रायपॉडसह, साडी अन् कंडोमची पाकिटेही आरोपींनी बाळगली होती का? अमितने शरणूला साडी नेसवून, त्याचे केस कापून तसेच फटाके फोडून त्रास देणे आणि या सगळ्याचा व्हिडिओ करून अपमानाचा बदला अपमानाने घ्यावा, असा तर हेतू बाळगला नव्हता ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अर्थात या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी
सोलापुरातील गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे अपहरण व मारहाण प्रकरणातील चारही आरोपीना पोलिसांनी न्यायालयात केले असता, न्यायाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाच्या अधिकचा तपासासाठी पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची केली मागणी होती. मात्र, पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीचे वकील अॅड.शरद पाटील यांनी युक्तिवाद करत विरोध केला. आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यायची विनंती केली होती. दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायमूर्ती वी.ए.कुलकर्णी यांनी ऐकून घेतले. त्यानंतर, आरोपी अमित सुरवसे, सुनील पूजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने या चौघाना 4 दिवसाची पोलीस सुनावण्यात आली असून याप्रकरणी पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.