Menu

अपराध समाचार
Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला दौंड हादरलं! बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून विटा,सिमेंटच्या चौकटीनं बेदम मारहाण, तरुणाने जीव सोडला

nobanner

पुण्यातील दौंड शहर गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला भीषण घटनेने हादरले आहे. बहिणीला पळवून नेल्याच्या वादातून चौघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विटा आणि सिमेंटच्या चौकटीने केलेल्या जबर मारहाणीमुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खून झालेल्या तरुणाचे नाव केतन सुडगे असे असून तो स्थानिक रहिवासी होता. चार आरोपींनी त्याला अडवून निर्दयी मारहाण केली. या हल्ल्यात विटा आणि सिमेंटच्या चौकटीचा वापर करण्यात आला. गंभीर दुखापतींमुळे केतनचा मृत्यू झाला. या घटनेने दौंड परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

पोलीस तपास सुरू
या प्रकरणी दौंड पोलिसांनी निखिल चितारे, प्रेम जाधव, विवेक कांबळे आणि विक्रांत कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून हा खून घडल्याचे समोर आले आहे. आरोपींनी कट रचून केतनवर हल्ला केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.खूनानंतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींवर खटला चालवला जाणार आहे. दरम्यान, हा प्रकार गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेची चौकशी वेगाने सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन संपूर्ण प्रकरणाचा तपशील समोर येईल, असा विश्वास दौंड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

डीजेवर गाणं लावून आयुषला संपवलं?
पुण्यातील नाना पेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा टोळीयुद्धाची घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच ठिकाणी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाली होती. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांच्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (Ayush Komkar) असे मृत तरुणाचे नाव असून, या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परत येत असताना, त्याच्या घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या. गंभीर जखमी झालेल्या आयुषला ससून रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या हत्याकांडाबद्दल पोलिस तपास करत आहेत.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.