अपराध समाचार
Kolhapur Crime: कोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात मुलानंच घातला वरवंटा
- 18 Views
- October 15, 2025
- By crimesoch
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on Kolhapur Crime: कोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात मुलानंच घातला वरवंटा
- Edit
कोल्हापुरात दारूसाठी पैसे देत नसल्याने जन्मदात्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची धकादायक घटना घडली. कोल्हापुरातील साळुंखे पार्क परिसरामध्ये ही घटना घडली. सावित्रीबाई अरुण निकम (वय 53) असं मृत महिलेचे नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी खून करणारा नराधम मुलगा विजय निकमला घटनास्थळावरून अटक केली आहे. आईचा खून केल्याने कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आईचा खून केल्याचे समजताच परिसरांनी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून तपासणी आणि पंचनामा केला. डोक्यात वरंवटा घातल्याने सावित्रीबाई यांच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
गंगावेशमध्ये बाजारात कार घुसली, एका महिलेचा मृत्यू
दुसरीकडे, काल (14 ऑक्टोबर)दिवाळी सणाच्या तोंडावर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी असतानाच कोल्हापुरात नेहमीच वर्दळ असणाऱ्या गंगावेश परिसरातील बाजारपेठेत वडाप वाहतूक करणारी कार घुसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. काल सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. सुशीला कृष्णात पाटील (वय 53) असे दुर्दैवी मृत महिलेचं नाव आहे. गंभीर जखमी झाल्याने सुशीला पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. गंगावेश परिसरात शाहू उद्यान परिसरात भाजी मडंईचा बाजार भरतो. ग्रामीण भागातून शेतकरी याठिकाणी भाजी विक्रीसाठी येत असतात. यामुळे परिसरात नेहमी वर्दळ असते. दरम्यानच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच एक वडाप वाहतूक करणारी कार बाजारात घुसल्याने भीषण अपघात झाला. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.