१० रुपयांच्या वादावरून दादरमध्ये भाजी विक्रेत्याने केला ग्राहकाचा खून
- 236 Views
- June 25, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on १० रुपयांच्या वादावरून दादरमध्ये भाजी विक्रेत्याने केला ग्राहकाचा खून
- Edit
मुंबईतील दादर या रेल्वे स्थानकाबाहेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केला. २४ जूनच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. फक्त १० रुपयांवरून वाद झाला अशी माहिती मिळते आहे. सोनीलाल असं या भाजी विक्रेत्याचं नाव असून तो फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या भाजीविक्रेत्याने ग्राहकाला १० रुपयांच्या वादावरून भोसकले.
दादर स्टेशनच्याबाहेर हा भाजी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात वाद झाला, हा वाद इतका विकोपाला गेला की भाजी विक्रेत्याने थेट ग्राहकाला चाकूनने भोसकले. जखमी ग्राहकाला तातडीने KEM रूग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच ग्राहकाचा मृत्यू झाला. मोहम्मद हनीफ असे मृताचे नाव आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. भाजी विक्रेत्याने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने भाजीवाल्याने ग्राहकाचा खून केल्याचे वृत्त दिले आहे.
ग्राहकाला भाजीवाल्याने चाकूने भोसकल्याचा प्रकार समजताच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले, मात्र तोपर्यंत भाजीवाला पळून गेला. दरम्यान तिथे असलेल्या इतर भाजी विक्रेत्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरूवात केली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे एका ग्राहकाला प्राण गमवावे लागले आहेत. शिवाजी पार्क पोलिसांचे पथक फरार भाजीवाल्याचा शोध घेत आहे.