Chhatrapati Sambhajingar Police : 1200 रुपयांत बनावट ग्राहक पाठवला, त्याचा मिस्क कॉल अन् पोलिसांची धाड, अनेक तरुणींची सुटका
महिला आणि मुलींचा वापर चुकीच्या माध्यमातून करुन त्यांचीदेखील पिळवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद पोलिसांना यश आलं आहे. एखाद्या थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी सिनेस्टाईल कारवाई पोलिसांनी केली. पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एका लॉजमध्ये चुकीचे कृत्य सुरु असल्याची माहिती मिळाली होती. महिलांचा वापर करुन त्यांना देहविक्रीच्या दलदलीत ढकललं जायचं. तसेच त्यांची आर्थिक पिळवणूक केली जायची,…
