देश,राजनीति
उत्तरेत दुरंगी, तर दक्षिणेत तिरंगी लढत
कर्नाटकातील लोकसभेच्या २८ मतदार-संघांच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. येत्या १७ एप्रिलला सर्वच मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यासाठी ४३५ उमेदवारांचे भवितव्य चार कोटी ६२ लाख ११ हजार ८४४ मतदार ठरविणार आहेत, त्यामध्ये केवळ २३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. एका माजी पंतप्रधानासह सहा माजी मुख्यमंत्री, तीन विद्यमान केंद्रीय मंत्री, एक कर्नाटकातील मंत्री, दोन मंत्र्यांचे चिरंजीव आदींचा फैसला होणार आहे. कर्नाटकात सत्तारूढ कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष सर्व २८ जागा लढवीत आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाने २५ मतदारसंघांत उमेदवारी दिली आहे. आम आदमी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. एखाद्या मतदारसंघाचा अपवाद वगळता या पक्षांचे उमेदवार प्रबळ आहेत. मुख्य लढत कॉँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि जनता दल अशीच आहे. त्यातही कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष सर्वच विभागांत प्रभावी आहेत. जनता दलाचा प्रभाव हा प्रामुख्याने दक्षिण कर्नाटकात राहणार आहे, त्यामुळे राज्यात गेल्या वर्षी सत्तेवर आलेल्या कॉँग्रेसची खरी परीक्षा आहे. उत्तर कर्नाटकातील सर्व अकरा मतदारसंघांत कॉँग्रेस