Menu

देश,राजनीति
टीव्हीवर नाही दिसणार भाजपचा जाहीरनामा

nobanner

नवी दिल्ली, दि.५ – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष येत्या ७ तारखेला त्यांचा जाहीरनामा सादर करणार असला तरीही टीव्हीवर तो दिसू शकणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. टीव्हीवर या जाहीरनाम्याचे प्रसारण झाल्यास ते लोक प्रतिनिधित्व कायद्यातील सेक्शन १२६(१) चे उल्लंघन मानले जाईल. कायद्यानुसार कोणताही राजकीय पक्ष मतदानापूर्वी ४८ तास आधी टीव्ही वा सिनेमाद्वारे पक्षाचा प्रचार करू शकत नाही. या नियमामुळे भाजप फक्त प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जाहीरनाम्याचा प्रचार करू शकतो. त्यांना टीव्हीच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी १२ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाट पहावी लागेल. मात्र तोपर्यंत देशात १११ जागांवर मतदान झालेले असेल. त्यामुळे या नियमाचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.