मुंबई : मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा काढणार्या उन्हाने शुक्रवारी अक्षरश: कहर केला. शुक्रवारी सांताक्रूझ येथील वेधशाळेत ३८ अंश सेल्सिअस एवढय़ा कमाल तापमानाची नोंद झाली असून, या उन्हाळी हंगामातील आतापर्यंत नोंदविण्यात आलेले हे सर्वाधिक तापमान आहे.
गेल्या आठवडाभरापासून शहराच्या कमाल आणि किमान तापमान उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत असून, मुंबईचे कमाल तापमान सरासरी ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. शिवाय किमान तापमानानेही उचल घेतल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. किमान तापमान २४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असतानाच आद्र्रताही ८८ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यातच दिवसा वाहणारे उष्ण वारे मुंबईकरांचा घाम काढत असून, रात्रीचा उकाडा मुंबईकरांना असह्य करीत आहे. परिणामी घशाला कोरड पडत असून, मुंबईकरांना अधिकच थकवा जाणवत आहे.
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीलगतच्या मध्य पूर्व अरबी महासागरावर चक्रीय परिभ्रमण स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय कोकण आणि गोव्याच्या
काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात
कमाल तापमान सरासरीच्या
जवळपास नोंदविण्यात येत आहे. हवामानातील बदलामुळे पुढील चोवीस तासांत दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर मुंबईतील कमाल तापमान ३६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.