Menu

देश
मोबाइलपाठी दडलंय काय..

nobanner

रविवार ६ एप्रिल २०१४ नवी दिल्ली : प्रत्येकाच्या हातात अपरिहार्यपणे दिसणारा मोबाइल फोनही आता निवडणूक वातावरणाने आंतरबाह्य वेढला गेला आहे. प्रचारासाठी मोबाइलमधील व्हॉट्स अँप, फेसबुक, स्काईप यासारख्या तंत्रज्ञानांचा सर्रास वापर केला जात आहे. पण त्याचबरोबर या मोबाइलची कव्हरदेखील विविध पक्षांच्या निवडणूक चिन्हांनी व्यापली आहेत. पूर्वी निवडणुकीत शर्टाला लावायचे बिल्ले बाजारात दिसायचे; नंतर पक्षाची चिन्हे असलेल्या टोप्या, उपरणी यांचा त्यात समावेश झाला. या निवडणुकीत तर त्यांनी मोठी बाजारपेठ व्यापली आहे. विविध पक्षांनी मोबाइल आणि त्यामधील व्हॉट्स अँप, फेसबुक, ट्विटर, स्काईप यांचा मोठय़ा प्रमाणावर होणारा वापर लक्षात घेऊन त्याद्वारे प्रचार सुरू केला आहे. पण तेवढय़ावरच न थांबता या मोबाइलच्या कव्हरवरही या पक्षांनी आपल्या निवडणूक चिन्हांची तसेच नेत्यांची छाप उमटवली आहे. मोबाइल कव्हरव्यतिरिक्त चहाचे मग, लेसर लाइट पेन, घड्याळे, स्कार्फ, थ्रीडी पॉकेट कॅलेन्डर हेदेखील बाजारात दाखल झाले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही काही कल्पक उत्पादने बाजारात आणली आहेत, असे सदर बाजारातील दुकानदार अनिलभाईसांगतात. थ्रीडी पॉकेट कॅलेन्डर, घड्याळे आणि मोबाइल कव्हर यांना चांगली मागणी असल्याचे अन्य एका दुकानदाराने सांगितले. त्यांनी नेत्यांचे मुखवटे, हॅण्डबॅण्ड, थ्रीडी हातपंखे आदी प्रचाराच्या वस्तूदेखील विक्रीस ठेवल्या आहेत. इतर प्रचाराच्या वस्तू -मतदान यंत्राचे प्रतीकात्मक मॉडल -राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांचे चित्र असलेले टी-शर्ट. -विशिष्ट पक्षाशी बांधिलकी दर्शविणारी मंगळसूत्रे ही खास आकर्षणाची वस्तू ठरली आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.