Menu

देश
६५ कोटींचे हेरॉईन जप्त

nobanner

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ जालंधर : सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटीअरच्या जवानांनी गुरुवारी अमृतसरच्या मुल्लकोट सीमा चौकीजवळून हेरॉईनची १३ पाकिटे जप्त केली. याशिवाय पिस्तूल व २४ काडतुसे जप्त करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या मादक पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घरात आहे. चौकीजवळ दोन तस्करांच्या संशयित हालचाली नोंदल्या गेल्या. त्यांना हटकले असता त्यांनी थेट जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनी यास सशस्त्र प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पहाटेच्या अंधाराचा फायदा उठवत हे तस्कर पसार झाले. गुरुवारच्या जप्तीनंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पंजाबमध्ये यंदा आतापर्यंत १८२.७ किलोहून अधिक हेरॉईन जप्त केले. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या तीन दिवसांत पाक सीमेवरून दुसर्‍यांदा मोठय़ा प्रमाणात मादक पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याअगोदर एक एप्रिल रोजी बीएसएफच्या जवानांनी अबोहर सेक्टरमधून २७ किलो हेरॉईन जप्त केले होते.(वृत्तसंस्था) – पंजाबमध्ये मादक पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण लक्षणीय असून, राज्यात विविध भागांत जनतेकडून तस्करीवर निर्बंध लादण्याची मागणी