Menu

देश
आनंदीबेन पटेल गमावणार गुजरातचे मुख्यमंत्रीरद?

nobanner

गांधीनगर, दि. १६ – आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षातील ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून भाजपाला या राज्यातील सत्ता गमावणे परवणार नाही. त्यामुळे आनंदीबने पटेल यांना हटवून त्यांच्या जागी नवा चेहरा आणण्याचा भाजपाचा विचार आहे.

यापूर्वीच आनंदीबेन पटेल यांनी आगामी निवडणूकित आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले होते. २२ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदींनी विरोधकांना धूळ चारुन पंतप्रधानपदावर झेप घेत्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर आनंदीबेन पटेल यांची वर्णी लागली होती.