Menu

अपराध समाचार
कर्जामुळे कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, एक अत्यवस्थ

nobanner

कर्जामुळे कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, एक अत्यवस्थ
बुलडाणा : बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील मालठाना इथे आदिवासी शेतकरी कुटुंबातील चार जणांनी विषप्राशन करुन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तर एक जण अत्यवस्थ आहे. त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरु आहेत.

एक लाख रुपयांच्या कर्जामुळे कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

दिनेश मसाने (वय 35 वर्ष), लक्ष्मीबाई मसाने (वय 40 वर्ष), जितेंद्र मसाने (वय 17 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. तर न्यानसिंग मसाने (वय 70 वर्ष) यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

मसाने कुटुंब मोलमजुरी करुन गुजराण करत होतं. त्यांच्याकडे एक एकर शेती आहे. मात्र त्यांच्यावर एक लाख रुपयांचं कर्ज होतं. या एक लाखांच्या कर्जामुळेच मसाने कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.