देश
मदत मिळत नसेल तर मनसेकडे संपर्क साधा – राज ठाकरे
nobanner
मदत मिळत नसेल तर मनसेकडे संपर्क साधा – राज ठाकरे
मुंबई : मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ही गावे अखेर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलीत.
दुष्काळाने जनता त्रस्त झालेली असतानाही सरकार मात्र ढिम्म आहे. आता तरी सरकारने दुष्काळाबाबत योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीये.
तसेच सरकारकडून मदत मिळत नसेल तर मनसेशी ०२२-४३३३६९९ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.
Share this: