Menu

देश
मुंबईच्या गोवंडीतील भीषण आग आटोक्यात

nobanner

मुंबईच्या गोवंडीतील भीषण आग आटोक्यात

मुंबई : गोवंडीच्या भीमवाडी झोपडपट्टी परिसरात लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि आठ वॉटर टँकर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

भीमवाडी झोपडपट्टीत पहाटे चारच्या सुमारास आग आली. आगीत 20 ते 30 घरं जळून खाक झाली आहेत. सिलेंडरच्या स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सध्या या परिसरात अग्निशमन दलाचं कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मात्र चिंचोळी रस्ते आणि धुरामध्ये कामात अडथळा येत आहे.