Menu

राजनीति
राहुल गांधींच्या प्रकृतीविषयी पंतप्रधान मोदी चिंतातूर

nobanner

राहुल गांधींच्या प्रकृतीविषयी पंतप्रधान मोदी चिंतातूर

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आजारी आहेत. त्यांची प्रकृतीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय चिंतातूर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी ट्विटरवरुन दिली.

जे पी नड्डा यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “पंतप्रधानांकडून समजलं की राहुल गांधी आजारी आहे. ते राहुल यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. पंतप्रधानांची काळजी लक्षात घेऊन मी राहुल गांधींच्य प्रकृतीविषयी विचारणा केली. तसंच त्यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली आहे.”

आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांचं हे ट्वीट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे.

ताप आल्याचं कारण देत राहुल गांधींनी मागील आठवड्यात त्यांचा पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळचा दोन दिवसांचा दौरा रद्द केला होता.

राहुल गांधींना अजूनही व्हायरल फीव्हर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी दिली आहे.