देश
‘करुन दाखवलं’ म्हणणारेही तुरुंगात जातील, शेलारांचा शिवसेनेला टोला
nobanner
मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यात 10 लेखापालांना अटक झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. आज केवळ अधिकारी आत गेले आहेत, यापुढे कंत्राटदार आणि त्यांच्या मागे ‘करुन दाखवलं’ असं समर्थन करणारेही तुरुंगात जातील असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यासंदर्भात भाजपने महापालिका आणि विधानसभेत दोन्ही ठिकाणी आवाज उठवला. त्याचमुळे आज ही कारवाई होत असल्याचं म्हणत शेलार यांनी या कारवाईचं श्रेय भाजपकडे घेतलं.
Share this: