देश
ठाणे विधानपरिषदेवर युतीचा झेंडा, सेनेचे रवींद्र फाटक विजयी
ठाणे विधानपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादीची सद्दी शिवसेनेने संपवली आहे. कारण शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे.
वसंत डावखरे हे गेल्या तीन टर्म या मतदार संघांतून निवडून येत होते. मात्र यंदा त्यांना गड राखण्यात अपयश आलं.
ठाणे विधानपरिषद निवडणूक : र500 मतांच्या पहिल्या फेरीत- डावखरे 189, रवींद्र फाटक 311 (अंतिम निकाल येणं बाकी)
राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंसमोर यंदा शिवसेना-भाजपने रवींद्र फाटकांना रिंगणात उतरवलं होतं. संख्याबळानुसार शिवसेना-भाजपकडे सर्वाधिक मतं असली तरीही दोन्ही उमेदवारांचं भवितव्य हे अपक्षांच्या 72 मतांवर अवलंबून होतं. त्यातच हितेंद्र ठाकूरांनी आपल्या बहुजन विकास आघाडीची मतं डावखरेंच्या पारड्यात टाकल्याने रवींद्र फाटकांसमोर आव्हान वाढताना दिसतं होतं.
ठाणे महापालिकेतील सर्वच मतदारांनी हक्क बजावला तर कल्याणमध्येही 100 टक्के मतदान झालं. ठाणे विधानपरिषदेठी 99.72 % मतदान झालं आहे. एकूण 1060 मतदारांपैकी 1057 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी 519 पुरुष मतदारांनी तर 538 महिला मतदारांनी मतदान केलं आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 13 मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडलं.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.