Menu

देश
विधान परिषद निवडणुकीत प्रसाद लाड माघार घेण्याची शक्यता

nobanner

03 जून : विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे 10 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 12 जणांपैकी नेमकं कोण माघार घेतंय. यावरच निवडणुकीचं अंतिम चित्रं स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड माघार घेण्याची शक्यता आहे.vidhan_parishd_bjp

त्यामुळे भाजप लाड सोबतच आणखी एका उमेदवाराचा अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करणार का याकडेच सर्वांचं लक्षं लागलंय. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी केली असून काँग्रेसकडून नारायण राणे, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि रामराजे निंबाळकर असे 3 मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपने सहा उमेदवार दिलेत. तर एकाने बंडखोरी केली आहे. सेनेचेही 2 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, निष्ठावंतांना डावलून भाजपने दिलेल्या उमेदवारांवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज आहे. याबद्दल काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.