Menu

देश
कार्यकाल पूर्ण होण्याआधीच गेडाम यांची बदली, नाशिककर संतापले

nobanner

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणकुमार गेडाम यांची अखेर नाशिकहून बदली झालीय. त्याविरोधात आता नाशकात तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय.

आज सरकारी निर्णयाचा निषेध करण्यासाठी मनसेचनं निर्दशनं केलीय. यावेळी बदली थांबवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आलीय.

महापौर अशोक मुर्तडक स्वतः यावेळी उपस्थित होते. कुंभमेळाच्या पार्श्भूमीवर नाशिक महापालिकेचा पदभार सांभाळणाऱ्या गेडाम यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच त्यांना नाशिकहून हटविण्यात आलंय. त्यांच्या या बदलीचा नाशिकारामधून विरोध होत असून सोशल मीडियावर राज्य सरकारचा निषेध केला जातोय.

का झाली गेडाम यांची बदली?
पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गेडाम यांनी इमारतींच्या कपाट पप्रकरणी कठोर भूमिका घेत बिल्डर लॉबीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता.

राजकीय दबावापुढे न झुकता शहरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरविला होता. त्यामुळे त्यांची बदली करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून काही शक्ती कार्यरत होत्या. त्यांना यात यश आलं असला तरी सर्वसामान्य नाशिककर नाराज झालाय.

बदली विरोधात आवाज उठविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय.

अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती
दरम्यान पुण्याचे पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय.