देश
नंदुरबारमध्ये ढगफुटी, रेल्वेट्रॅक खचला, प्रवासी रात्रभर ट्रेनमध्ये
nobanner
नंदुरबार जिल्ह्यात पावसाने अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. नवापूर तालुक्यातील पाचोराबारी या गावात तर ढगफुटी झाली आहे. काल रात्री अकरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
त्यामुळे जळगाव-सुरत रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवासी रात्रभर ट्रेनमध्ये बसून होते. जळगावहून सुरतकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन नंदुरबारपर्यंत आणि सुरतकडून येणाऱ्या नवापूरपर्यंत चालविल्या जात आहेत.
रेल्वे रुळ खचल्यामुळे ही रेल्वे वाहतूक कधी सुरु होणार हे अद्याप अस्पष्ट आहे.
Share this: