Menu

मनोरंजन
रजनीकांतच्या ‘कबाली’ची उत्सुका, कंपन्यांकडून सुटी जाहीर

nobanner

अभिनेता रजनीकांत यांच्या आगामी कबाली चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. २२ जुलैला कबाली प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहता यावा याकरिता, चेन्नई आणि बंगळुरुतल्या अनेक कंपन्यांनी, २२ जुलैला आपल्या कर्मचा-यांना सु्ट्टी जाहीर केली आहे.

क्षिणेतला मेगा सुपरस्टार रजनीकांत याच्या नव्याने झळकणाऱ्या चित्रपटाचं आकर्षण, चित्रपट रसिकांमध्ये विशेष करुन असतं. त्यामुळे २२ जुलैला रजनीकांतच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणत आजारपणाची सुट्टी टाकली जाण्याचा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर चेन्नई तसेच बंगळुरुतल्या विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी २२ तारखेला सुट्टीच जाहीर करुन टाकली आहे. तर अनेक कंपन्यांनी स्वतःच आपल्या कर्मचाऱ्यांना, कबालीचं मोफत तिकीटही उपलब्ध करुन दिले आहे.