Menu

देश
सागरी शौर्य पदकाने गौरव, जगातील पहिलीच भारतीय महिला

nobanner

भारताची मान जगात गौरवाने उंच होईल असा सन्मान नौदल सेवेतील एका महिला अधिकाऱ्याला दिला जात आहे. समुद्रात केलेल्या साहसाबद्दल भारतीय महिलेला सागरी शौर्य पदकाने गौरविण्यात येत आहे. हा सन्मान मिळवणारी ही जगातील पहिलीच महिला ठरणार आहे.

पाच वर्षांपूर्वी नौदल सेवेत दाखल झालेल्या राधिका मेनन यांच्या नावावर हा ऐतिहासिक विक्रम होत आहे. राधिका मेनन यांनी समुद्रात कठीण परिस्थितीत अडकलेल्या 7 मासेमारांचे प्राण वाचवले होते. समुद्रातील या अद्भुत साहसाबद्दल मेनन यांना आंतरराष्ट्रीय मरिन संस्थेद्वारा गौरविलं जात आहे.

खवळलेल्या समुद्रात मासेमारांचे वाचवले प्राण

जून 2015 मध्ये आंध्र प्रदेशमधील काकिनाडा येथून ओडिशा येथील गोपालपूरला जात असलेल्या मासेमारांची नाव समुद्राच्या मध्यात उलटली. खवळलेल्या समुद्रात बोटीचं इंजिन खराब झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. सर्व मासेमारांच्या घरी हा बातमीनंतर अंत्यविधीचीही तयारी केली गेली. मात्र तेवढ्यात सर्व मासेमारांना सुखरुप वाचवलं असल्याचा सुखद धक्का देणारा एक फोन आला. राधिका मेनन आणि त्यांच्या टीमने सर्व मासेमारांचे प्राण वाचवले.

राधिका सध्या शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या जहाजावर नौदल अधिकारी म्हणून कार्यरत आहे. समुद्रात संकटात असलेल्यांना वाचवणं हे आपलं कर्तव्यच असल्याचं मेनन यांनी ईमेल करुन म्हटलं आहे.