Menu

देश
सावधान !, मोबाईलची बॅटरी जीवावर बेतू शकते

nobanner

मुंबई : आपला नेहमीच्या वापरातील मोबाईल फोन अचानक धूर येऊन फुलबाजा सारखा आवाज करू लागला तर त्याला आपल्या शरीरापासून दूर ठेवा. ठाण्यातील एका कार्यालयात असाच प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अचानक टेबलवर ठेवलेला मोबाईल फुटण्याची अवस्था निर्माण झाली होती. जर हा मोबाईल फोनवर बोलणं सुरू असताना जळाला असता तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं.thane_mobile_blast

ठाण्यातील महानगर पालिका मुख्यालयात एका मोबाईलचा छोटा स्फोट झाला त्यात टेबल आणि मोबाईलचं नुकसान झालं. मोबाईल जळून खाक झालाय. आता या मोबाईलच्या मालकांनी हा प्रकार म्हणजे जीवघेणा अपघात असल्याचं सांगितलंय. पावसात मोबाईल भिजल्यानंतर मोबाईलची बॅटरी बदलण्यात आली होती. त्यानंतर या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. हा प्रकार या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. आता या प्रकारची गंभीर दखल घेऊन मोबाईल कंपन्यांनी नकली बॅटरी बनवणार्‍या आणि दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी केली आहे.