अपराध समाचार
सोलापुरात मशरुम गणपती मंदिराचा 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला
- 374 Views
- July 21, 2016
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on सोलापुरात मशरुम गणपती मंदिराचा 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला
- Edit
nobanner
सोलापुरात मशरुम गणपती मंदिराचा 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला
सोलापूर : सोलापुरात हिप्परगामधील मशरुम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. तब्बल 25 तोळे सोन्याचा कळस चोरट्यांनी लांबवला आहे.
बुधवारी रात्रभर सोलापूर भागात मुसळधार पाऊस पडत होता. त्याचवेळी वीजपुरवठाही खंडीत झाला होता. याचाच फायदा चोरट्यांनी उचलून कळस लांबवल्याचं बोललं जातंय.
सकाळी पुजारी आल्यानंतर प्रसिद्ध गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याचं लक्षात आलं. भाविकांच्या योगदानातून हा मिश्र धातूंचा कळस बांधला होता, त्याला 25 तोळे सोन्याचा मुलामा होता.
स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
Share this: