Menu

देश
कोळ्यांचं छोटसं यंत्र बुडालेल्या बस शोधणार?

nobanner

सावित्री नदीच्या पात्रात दोन दिवसांनंतरही शोधमोहीम सुरुच आहे. शोधकार्यात अधूनमधून पावसामुळे अडथळे निर्माण होत आहेत. दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी आज सकाळपासून आणखी 6 मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे हाती लागलेल्या मृतदेहांची संख्या शुक्रवारी दुपारी 12 पर्यंत 20 वर पोहोचली आहे. महाड पूल दुर्घटनेत 42 जण बेपत्ता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, शोधपथकानं स्थानिक मच्छिमारांची मदत घेऊन तिसऱ्या दिवसाचं शोधकार्य सुरु केलं आहे. मात्र, दोन्ही बस आणि इतर वाहनं कुठे आहेत, याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही.

फिश फाईंडरची मदत

स्थानिक मच्छिमारांनी त्यांच्या पद्धतीने शोधकार्य सुरु केलं आहे. आधी त्यांनी नांगर टाकून शोधकार्य सुरु केलं. मग त्यांनी फिश फाईंडरची मदत घेतली आहे. त्यांच्याकडे कॅमेरा सदृश्य यंत्र आहे, जे पाण्यात सोडल्यानंतर खालील परिस्थितीची दृश्य बोटीतील स्क्रीनवर दाखवतं. हे यंत्र जहाज किंवा बोटीतून मासेमारी करण्यासाठी गेल्यानंतर वापरतात. बोट किंवा जहाजातून प्रवास करताना खाली खडक किंवा बुडालेलं जहाज वैगेरे असेल तर त्याची कल्पना हे यंत्र देतं.

त्यामुळे दोन भल्यामोठ्या एसटी बसेस, तवेरासह गायब वाहने सापडण्याच्या आशा बळावल्या आहेत.

कोकणातील कोळी एकवटले

महाड पूल दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशीही एसटी बसचा शोध न लागल्यामुळे, शोधपथकाच्या मदतीला कोकणातील कोळीबांधव आले आहेत. सकाळपासून मालवण, सिंधुदुर्ग, रेवस इथून मच्छिमारांची पथकं महाडमध्ये सावित्रीनदीजवळ दाखल झाली आहेत.

ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटना

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला. या पुरात 2 बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.