Menu

अपराध समाचार
पद्मनाभस्वामी मंदिरातून १८६ कोटींचे सोने ‘गायब’

nobanner

केरळमधील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिरातून सोन्याची भांडी गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका अहवालानुसार मंदिरातून सोन्याची ७६९ भांडी गायब झाली आहेत. या सोन्याच्या भांड्यांची किंमत तब्बल १८६ कोटी इतकी आहे.
विनोद राय समितीने केलेल्या मंदिराच्या ऑडिटमध्ये ही धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. न्यायालयाने ऑक्‍टोबर २०१५ साली राय समितीला ऑडिट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विनोद राय समितीने पाहणी करून पाच भागांमध्ये अहवाल तयार केला. शुद्धीकरणाच्या नावाखाली मोठया प्रमाणावर सोने गहाळ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मंदिर व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार असल्याचे समोर आले आहे. या अहवालानुसार, शुद्धीकरणामध्ये २.५० कोटी रुपये सोन्याचे नुकसान झाले आहे. मंदिराच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असून, १४.१८ लाख रुपयांच्या सोने आणि चांदीची रजिस्टरमध्ये नोंदणीही केलेली नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर एम लोढा आणि ए के पटनायक यांच्या खंडपीठाने गेल्यावर्षी राय समितीला पद्यनाभस्‍वामी मंदिराच्या २५ वर्षांच्या कारभाराचे ऑडिट करण्यास सांगितले होते.