Menu

देश
पीएफधारकांना मिळणार स्वस्तात घरे

nobanner

तुम्ही पीएफधारक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पीएफधारक कामगारांना स्वस्त दरात घरे देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिलीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2022पर्यंत देशातील प्रत्येकाला घर उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा लोकसभा निवडणुकीदरम्यान केली होती. ही घोषणा पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे बंडारु म्हणाले.