देश
पुण्यात उझबेकिस्तानच्या महिलेचं सेक्स रॅकेट, हॉटेलवर पोलिसांची धाड
पुण्यातील डेक्कन पोलिसांनी पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला उझबेकिस्तानमधील असून पुण्यात सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.
पुणे पोलिसांनी डेक्कन परिसरातील एका हॉटेलवर धाड टाकून तिला ताब्यात घेतलं आहे. तिच्यावर फर्ग्युसन कॉलेज रोडवरील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. तिच्यासोबत अजून कितीजण या रॅकेटमध्ये सामील आहेत याचा शोध पुणे पोलिस घेत आहेत.
दरम्यान पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेक्स रॅकेट उघडकीस आली आहेत. याआधी 11 ऑक्टोबर 2013 रोजी दोन उझबेकिस्तानमधील मुलींना पोलिसांनी अटक केली होती.
तसंच काही दिवसांपूर्वीच पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेलाही पोलिसांनी अटक केली होती. कल्याणी देशपांडेचा 2013 सालच्या रॅकेटमध्येही सहभाग होता.