अपराध समाचार
भिवंडीत नागरिकांकडून रोडरोमियोची जबरदस्त पिटाई
- 268 Views
- August 09, 2016
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on भिवंडीत नागरिकांकडून रोडरोमियोची जबरदस्त पिटाई
- Edit
nobanner
भिवंडीत एका रोडरोमियोची नागरिकांनी चांगलीच पिटाई केली. साजिद मौलाना अंसारी असं या रोड रोमियोचं नाव आहे.
साजिद शाळेतल्या मुलींची नेहमी छेड काढत होता. सोमवारीही कमला हॉटेलच्या जवळ साजिदनं काही विद्यार्थिनींची छेड काढली यावेळी या विद्यार्थिनींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
मुलींचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले आणि त्यांनी या मुलींची चौकशी. केली. त्यानंतर साजिदला याचा जाब विचारला असता त्यानं अरेरावी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी साजिदची चांगलीच धुलाई केली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केलं.
Share this: