देश
महाड दुर्घटनेतली दुसरी बसही सापडली
nobanner
महाड दुर्घटनेतली दुसरी बसही आता सापडली आहे. नौदलाच्या शोधकार्यामध्ये 500 मीटर अंतरावर ही बस सापडली आहे. थोड्याच वेळामध्ये ही बस बाहेर काढण्यासाठीच्या कामाला सुरुवात होणार आहे. दोन दिवसांपूर्वी पुलापासून 250 मीटर अंतरावर राजापूर-बोरिवली या पहिल्या बसचे सांगाडे सापडले होते.
महाडमधला सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये एसटीच्या दोन बस आणि काही वाहनं वाहून गेली होती.
Share this: