Menu

मनोरंजन
रुस्तमच्या यशामुळे अक्षय कुमार खुश, प्रमोशन करणाऱ्या बॉलीवूडचे मानले आभार

nobanner

अक्षय कुमारच्या रुस्तम चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या यशामुळे अक्षय कुमार खुश झाला आहे. रुस्तम चित्रपटाचं प्रमोशन करणाऱ्या बॉलीवूडच्या कलाकारांचे अक्षयनं वेगळ्या शैलीत आभार मानले आहेत.

अक्षय कुमारनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकून या कलाकारांचे आभार मानले आहेत. आलिया भट्ट, सलमान खान, वरुण धवन, सोनम कपूर, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा, करण जोहर, फवाद खान यांनी रुस्तमचं प्रमोशन केलं होतं. या सगळ्यांसाठी अक्षयनं हा व्हिडिओ शेअर केला आहे.