अपराध समाचार
शिरुरचे माजी नगराध्यक्ष महेंद्र मल्लाव यांची निर्घृण हत्या
- 246 Views
- August 28, 2016
- By crimesoch
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on शिरुरचे माजी नगराध्यक्ष महेंद्र मल्लाव यांची निर्घृण हत्या
- Edit
nobanner
शिरुरचे माजी नगराध्यक्ष महेंद्र मल्लाव यांची निर्घृण हत्या
पुणे : शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष महेंद्र हिरामन मल्लाव यांच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तलवारीने भोसकून मल्लाव यांची हत्या करण्यात आली.
राम आळी परिसरात त्यांच्यावर अज्ञातांनी धारधार तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मल्लाव यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मल्लाव हे काँग्रेसकडून शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक होते, तर माजी शहराध्यक्षही राहिले होते. पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा म्हटलं जात आहे.
Share this: