अपराध समाचार
कोपर्डीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- 266 Views
- September 26, 2016
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on कोपर्डीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- Edit
कोपर्डीच्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात मराठा मोर्चांनी समाजमन ढवळून निघालेलं असतानाच अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. पाथर्डी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडलीय.
चिंतेची बाब म्हणजे अत्याचार झालेली मुलगी गतिमंद आहे. याप्रकरणी 53 वर्षीय आरोपीला मोहारी गावातून अटक करण्यात आलीय. अशोक सदाशिव वाल्हेकर असं आरोपीचं नाव आहे. मुलगी घरी एकटीचं असल्याचं पाहून आरोपींनं तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी मुलीची आई अहमदनगरला डॉक्टरांकडे होती, तर वडील शेतावर कामासाठी गेले होते.
गावकऱ्यांनी स्वतःहून आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलंय. मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला.
पाथर्डीमध्ये उत्स्फूर्त बंद पाळून हा मूक मोर्चा काढण्यात आला. गावातील आंबेडकर चौकातून हा मोर्चा काढून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोठ्या प्रमाणावर तरुण मुली, महिला आणि ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते.आरोपींला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.