अपराध समाचार
दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवालांना भाजप महिला कार्यकर्त्यांचा घेराव
- 285 Views
- September 08, 2016
- By crimesoch
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवालांना भाजप महिला कार्यकर्त्यांचा घेराव
- Edit
दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवालांना भाजप महिला कार्यकर्त्यांचा घेराव लुधियानाला जाणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना भाजप महिला कार्यकर्त्यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर घेराव घातला. केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्र्याचे सेक्स स्कॅण्डल, आणि पंजाबमधील तिकीट वाटपात महिलांचे शोषणप्रकरणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी केजरीवालांनी घेराव घालून बांगड्याही दाखवल्या.
आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल जनशताब्दी एक्सप्रेसने लुधियानाला जण्यासाठी नवी दिल्ली स्टेशनवर पोहोचले. यावेळी तिथे उपस्थित भाजपा महिला कार्यकर्त्यांनी केजरीवालांविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.
अरविंद केजरीवाल जेव्हा जनशताब्दी एक्सप्रेसच्या बोगीत दाखल झाले. त्यावेळीही भाजप महिला कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यांनी बोगीत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना आडवले.
दिल्ली मंत्रिमंडळातील माजी मंत्री संदीप कुमार यांचे सेक्स स्कॅण्डल आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपच्या पंजाबमधील नेत्यांकडून तिकीट वाटपाच्या बदल्यात महिलांचे शोषण करत असल्याचा आरोप आपचेच आमदार देविंदर सहरावत यांनी केला होता. यालाच भाजपने मुद्दा बनवून, आज भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केजरीवालांचा निषेध नोंदवला.
यावेळी संतप्त भाजप महिला कार्यकर्त्यांनी केजरीवालांना बांगड्याही दाखवल्या.