Menu

धर्म / आस्था
नार्वेकरांच्या घरी मुख्यमंत्र्यांचं ‘बाप्पा मोरया रे’, राजकीय चर्चेला उधाण

nobanner

cm_meet_naravekar_मुंबई,06 सप्टेंबर : या ना त्या वादामुळे भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये नेहमी ‘विघ्न’ येत असता. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही ‘विघ्न’ आता टाळण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त पुढे आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू स्विय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्विय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणेश दर्शनासाठी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. युतीमध्ये सतत होणारे वाद मिटवण्यासाठी, मातोश्‌्ा्री वरील ‘संबंध आणि संपर्क’ महत्वाचे ठरतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘मातोश्री’शी असलेले संबंध आणि संपर्क ‘बळकट’ करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनीच मिलींद नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनाला हजेरी लावली. सरकारमधील अनेक मंत्र्यांकडे गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. पण मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांकडे न जाता मिलिंद नार्वेकर यांच्याकडे दर्शनासाठी गेल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.