राजनीति
निवडणुकांसाठी नव्हे, देशासाठी युद्ध करा : उद्धव ठाकरे
निवडणुकांसाठी नव्हे, देशासाठी युद्ध करा : उद्धव ठाकरे
मुंबई : पाकिस्तानशी आता केवळ चर्चेने काम होणार नाही, तर त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, युद्ध व्हायचं असल्यास देशासाठी व्हावं, निवडणुकांसाठी होऊ नये, असं स्पष्ट मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. पाकिस्तानची भाषा आपल्याला कधी समजणार? असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.
मागच्या पानावरुन पुढे
उरीतील हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानची भाषा आपल्याला कधी समजणार? पाकिस्तान भारताशी कसा वागतो हे लक्षात ठेवा, त्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदींकडे बहुमत आहे, त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणीही त्यांनी केली. मागच्या पानावरुन पुढे जाणार असू तर मग बदल झाला असं आपण कसं म्हणायचं, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी मांडला.
संतापतो, थंड होतो आणि पुन्हा पाकमध्ये जाऊन गरम चहा
हल्ल्यांची मालिका पाहता, ज्याला जे अश्रू ढाळायचेत ते ढाळा, आम्ही मात्र पाकिस्तानात जाऊन चहा पिऊन येतो, असं सरकार असं सांगतंय, असंच वाटत असल्याच उद्धव ठाकरे म्हणाले. आपण संतापतो, थंड होतो आणि पुन्हा पाकमध्ये जाऊन गरम चहा पितो, पाकिस्तानचे कलाकार, खेळाडू सगळ्यांचं स्वागत करतो, असा टोलाही उद्धव यांनी हाणला. चहा पित राहतो, अश्रू पुसण्याच्या आधी पुढील हल्ल्याची वाट पाहतो, असं धोरण आहे का? असा सवालही त्यांनी विचारला.
सरकारचे मित्रपक्ष आहोत, हे आम्ही मानतो
पाकिस्तानविरोधात ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे, सत्तेवर येण्यापूर्वी मोदींनी जी आश्वासनं दिली ती त्यांनी पाळावीत, अशी आठवणही उद्धव यांनी मोदींना करुन दिली. जनतेने मोठ्या विश्वासाने मतं दिली आहेत, हे पंतप्रधान मोदींनी विसरता कामा नये, असं उद्धव म्हणाले. आम्ही सरकारचे मित्रपक्ष आहोत, हे आम्ही मानतो, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपलाही टोला हाणला.
अशाप्रकारचा हल्ला पहिल्यांदाच झाला नाही, यापूर्वी पठाणकोटमध्येही झाला आहे. पाकला हिंदुस्थानातील प्रत्येकाची भावना कळत नाही, तोपर्यंत या संतापाच्या भावनेला काही अर्थ नाही, या शब्दात उद्धव यांनी संताप व्यक्त केला. युद्ध व्हायचं असल्यास देशासाठी व्हावं,
निवडणुकांसाठी होऊ नये, असंही उद्धव म्हणाले.
मराठा आरक्षणावर स्वतंत्र अधिवेशन बोलवा
मराठा आरक्षणावर एक दिवसीय स्वतंत्र अधिवेशन बोलवावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाच्या प्रश्नी प्रत्येक नेत्याने मत मांडावं, असं आवाहनही त्यांनी केलं. अॅट्रॉसिटी आणि आरक्षणावर विधिमंडळात चर्चा करावी. शरद पवारांनी या विषयावर संसदेत मुद्दा मांडावा, आम्ही राज्याच्या विधिमंडळात मांडू, असंही ते म्हणाले.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.