Menu

देश
पतंजलीचं ‘मेड इन नागपूर’, फूड पार्कचं भूमिपूजन

nobanner

10 सप्टेंबर : नागपूरच्या मिहानमधील बहुचर्चित पतंजली फूड आणि हर्बल पार्कचं मोठ्या थाटामाटात भूमिपूजन पार पडलं. या समारंभात आतापर्यंतचा कॉर्पोरेटचा शिष्टाचार मोडून पतंजलीचे लाखांहून अधिक साधक एकत्रित आले. तसंच यावेळी शेतकरी संमेलनसुद्धा होणार आहे. भूमिपूजनाची सुरुवात यज्ञाने झाली.

patanjali_nagpurमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड या कंपनीला मिहानमध्ये 25.50 लाख रुपये एकरी भावात 230 एकर अविकसित जमीन दिली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलीकडेच पतंजली किसान सेवा समितीची बैठक झाली.

निर्णयानुसार भूमिपूजन समारंभात एक लाखापेक्षा जास्त साधक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नागपूरसह बुलडाणा, नांदेड, वाशीम, वर्धा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदियासह संपूर्ण विदर्भातील साधक उपस्थित आहे. या कार्यक्रमासाठी सर्वसामान्यांना खुले निमंत्रण देण्यात आले आहे. नागरिकांना भूमिपूजनस्थळी येण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण, विशिष्ट अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर संत्र्याचा जून प्रोसेस होऊन पॅक होणार आहे.

विदर्भाला काय मिळणार?
– मिहान प्रकल्पात 230 एकर जागा
– पतंजलीनं 64.38 कोटी सरकारला दिले
– एकूण गुंतवणूक : 1 हजार कोटी
– 5 हजार लोकांना रोजगार देण्याची योजना
– 50 हजार शेतकर्‍यांना फायदा होईल, असा दावा
– संत्र्याच्या रसावर प्रक्रिया करून पॅकेजिंग करणार
– इतर हर्बल उत्पादनंही बनवणार