अपराध समाचार
प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुश पनवार दोषी
- 275 Views
- September 06, 2016
- By crimesoch
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुश पनवार दोषी
- Edit
06 सप्टेंबर : 2013 साली घडलेल्या प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुश पनवारला दोषी ठरवल आहे. मुंबईतल्या विशेष महिला कोर्टानं हा निर्णय दिला आहे. उद्या शिक्षेवर युक्तिवाद होणार आहे.
प्रीती राठी ही मूळची दिल्ली असून, नौदलात नोकरी लागल्याने ती 2 मे 2013 रोजी मुंबईत आली होती. अंकुरचं प्रीतीवर एकतर्फी प्रेम होतं. प्रीतीचा पाठलाग करत तो मुंबईत आला. वांद्र स्थानकावर उतराताच त्याने प्रीतीवर अॅसिड फेकलं. अॅसिड हल्ल्यात तिचा संपूर्ण चेहरा आणि डोळ्याला दुखापत झाली. अॅसिडचा काही अंश तोंडात गेल्याने अन्ननलिकेलाही इजा पोहोचली होती.
दरम्यान, हल्ल्यानंतर तिला ताबडतोब बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण उपचार सुरू असताना महिन्याभरातचं प्रीतीचा मृत्यू झाला. तब्बल तीन वर्षानंतर आज कोर्टाने अंकुशला दोषी ठरवलं आहे.
हलाखीची परिस्थिती असूनही तिच्या पालकांनी तिच्या नर्सिंगचं शिक्षण केलं. तिनं आधी दिल्लीत नर्सची नोकरी केली. त्यानंतर ती जिद्द आणि मेहनतीमुळे नौदलात नोकरीसाठी निवडली गेली होती.
प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरण
– प्रीती राठी आणि दोषी अंकुर पनवार दोघंही दिल्लीचे रहिवासी
– अंकुरचं प्रीतीवर एकतर्फी प्रेम होतं
– एप्रिल 2013 : संरक्षण मंत्रालयात नोकरीसाठी प्रीतीची निवड
– 2 मे 2013 : प्रीती, तिचे वडील, काका आणि काकू वांद्रे टर्मिनसवर उतरले
– काही क्षणांतच अंकुरनं प्रीतीवर अॅसिड फेकलं
– डोळे, अन्ननलिका आणि किडनीला गंभीर इजा
– बॉम्बे हॉस्पिटल या प्रतिष्ठित रुग्णालयात उपचार
– 1 जून 2013 : प्रीतीचा मृत्यू
– 17 जून 2013 : अंकुर पनवारला अटक
– 6 सप्टेंबर 2016 : अंकुरला कोर्टानं दोषी ठरवलं