अपराध समाचार
मनसेची दादागिरी, उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण
- 206 Views
- September 08, 2016
- By crimesoch
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मनसेची दादागिरी, उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण
- Edit
मनसेची दादागिरी, उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा मराठी कार्ड बाहेर काढलं आहे.
घाटकोपरमध्ये एका उत्तर भारतीय फळ विक्रेत्याला मनसेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. अमृतनगरमध्ये काल संध्याकाळी 4 ते 5 च्या दरम्यान हा प्रकार घडला. मारहाणीनंतर त्याच्या हातगाडीवरची फळंही रस्त्यावर फेकून दिली.
या मारहाणीमागे दोन कारणं सांगितली जात आहेत..पहिलं म्हणजे या भागात परप्रांतियांनी रस्त्यावर दुकानं थाटू नयेत, म्हणून ही मारहाण झाली, तर दुसरं कारण म्हणजे संबंधित व्यक्तीने कुण्या एका मराठी व्यक्तीला आडकाठी केल्यानं ही मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया
ही मारहाण नाही तर हे आंदोलन आहे. उत्तर भारतीयांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर दिलं. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यास आडकाठी करणाऱ्या परप्रांतियांना असंच उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी दिली.
भाजप आमदार आशिष शेलार
कोणीही कायदा हातात घेईल, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला. मनसे शेतकऱ्यांच्या नावावर उत्तर भारतीयांना मारहाण करणार असेल, तर त्यांनी आधी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं. मनसेने शेतकऱ्यांसाठी आठवडी बाजार भरवावा, त्याबाबतचा प्रस्ताव घेऊन यावा, मी स्वत: त्यासाठी प्रयत्न करेन, असंही शेलार म्हणाले.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.