देश
मुंबईसह उपनगरात ‘कोसळधार’, रस्ते-लोकल वाहतूक मंदावली
मुंबई : मुंबई, ठाण्यासह कोकण पट्ट्यात परतलेल्या वरुणराजाची न थकता, न थांबता तुफान बॅटिंग सुरु आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर ठाणे, पालघरलाही पावसाने झोडपलं आहे. मागील 21 तासात मुंबईत 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे दादर आणि आसपासच्या परिसरातील अनेक शाळांना आज सुट्टी
सकाळी सात वाजेपर्यंत मुंबई आणि उपनगरातील पावसाची आकडेवारी
मुंबई शहर – 68.09 मिमी
मुंबई उपनगर (पूर्व) – 69.73 मिमी
मुंबई उपनगर (पश्चिम) –virar rain88.65 मिमी
पावसामुळे वसई-विरारची दैना
परतीच्या पावसाने वसई आणि विरारमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुधवारी दुपारपासून जोर धरलेल्या पावसाने रात्रभर सर्वत्र पाणीच पाणी झालं. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास विरार पूर्वमधील फुलपाडा पापडखींड धरण भरल्याने आजूबाजूचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. तर काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
गेल्या 24 तासांमधील पावसाची आकडेवारी
पालघर 315 मिमी
डहाणू 456 मिमी
तलासरी 72 मिमी
बोईसर 344 मिमी
वसई- 85 मिमी
——————-
मुंबई : मुंबई, ठाण्यासह कोकण पट्ट्यात परतलेल्या वरुणराजाची न थकता, न थांबता तुफान बॅटिंग सुरु आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर ठाणे, पालघरलाही पावसाने झोडपलं आहे. मागील 21 तासात मुंबईत 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सततच्या मुसळधार पावसाने मुंबई अक्षरश बेहाल झाली आहे. हिंदमाता, अंधेरी, परेल अशा अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सततच्या पावसाने रस्ते जलमय झाले असून रस्ते वाहतूकही मंदावली आहे. तर रेल्वेरुळांवरही पाणी भरल्याने लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत.
मुंबईची लाईफलाईनही कोलमडली
तुफान पावसाचा परिणाम मुंबईच्या लाईफलाईनवरी झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. तर रस्ते वाहतुकीबरोबरच हार्बर मार्गावरील सीएसटी ते अंधेरी दरम्यानची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबईतील पाणीसाठ्याचा 8 वर्षांचा उच्चांक
एकीकडे सततच्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना झालेली असताना दुसरीकडे याच पावसाने मुंबईकरांवर कृपा केली आहे. मुसळधार पावसाने मुंबईतील तलावांमध्ये 8 वर्षांचा विक्रमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढच्या सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईतील तलावांची साठवण क्षमता 14 लाख दक्षलक्ष लिटर असून ही पातळी आधीच ओलांडली आहे. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा धरणं तुडूंब भरली आहे. 2015 मध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने मुंबईत आॅगस्टपर्यंत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती.